Friday, 28 February 2014

Telangana - 29th - How many more...?

भारताचे २९वे राज्य किंवा दुसऱ्या भाषेत म्हणायच झाला तर भारताचा २९वा तुकडा. २०/०२/२०१४ रोजी राज्य सभेत स्वतंत्र तेलंगणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली व आपल्या भारत मातेचा अजून एक तुकडा पडला. या घटनेनंतर काही प्रश्न डोक्यात आल्यावाचून राहत नहित.



खरच या २९व्या राज्याची गरज होती ? या राज्याच्या प्रगतीचे मार्ग केवळ वेगळे राज्य म्हणून मान्यता मिळाल्यावरच उघडणार होते ? केवळ मतांच राजकारण करून आपला स्वार्थ साध्य करण हाच या मागचा हेतू होता ? काँग्रेस व भाजपाचे सर्व खाजदार ज्या गोष्टी साठी एकत्र आले ती गोष्ट एवढी महत्वाची होती ? निवडणुका तोंडावर असतानाच एवढे दिवस रखडत पडलेला हा प्रश्न का सोडवण्यात यावा ?

या सारख्या अनेक प्रश्नांच वादळ माझ्या सारख्या अनेक लोकांच्या मनात उठल यात मला काडीमात्र शंका नाहि. भारतमातेचे तुकडे पाडण्याची प्रथाच आमच्या देशात रूढ होत आहे. अगदी इतिहासात जाऊन पाहिलं तरी आम्हाला हेच जाणवत.

पाकिस्तान वेगळा झाला आणि आमच्या अखंड सिंधु नदीचे दोन तुकडे पडले. आम्ही पहात राहिलो व काहीही करू शकलो नाही. संयमाचा बांध एक दिवस फुटला व नथुराम गोडसेंनी गांधी वध केला. पण यातून कोणालाच काही मिळाल नाही.

भारताने गांधीजींसारखे थोर व्यक्तीमत्व गमावले. भारताचे दोन तुकडे झाले व भारताला नवीन शेजारी मिळाला. आमच्या या नविन शेजाऱ्याने शेजार धर्म मात्र कधीच पाळला नाही. ज्या उद्देशाने ही फाळणी करण्यात आली होती तो कितपत साध्य झाला यातही शंका आहेच. मग आमच्या नेत्यांना देशाचे अजून किती तुकडे हवे आहेत ? आणि या पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांना आम्हाला अजून किती नविन राज्य पाहायला मिळणार आहेत ? आणि या सर्व पार्श्वभूमीवर रामविलासजी तर महाराष्ट्राचे अजून तीन तुकडे करू पाहतायत. मग अखंड भारतवर्ष या संज्ञेला काय अर्थ राहतो हे त्यांनाच ठाऊक. आधि राज्य वेगळी करा, मग राज्यातली शहर वेगळी करा, मग शहरातली नगर वेगळी करा. हे सर्व करताना आपण कुठेतरी माणसापासून माणूस वेगळा करतोय हे ध्यानात राहू द्या.

प्रगती करण्यासाठी आपण एकात्मतेचा बळी देत असू तर या गोष्टीची किंमत आपल्याला नक्कीच मोजावी लागेल. पण तेव्हा वेळ निघून गेली असेल यात शंका नाही आणि मग शेवटी उरेल तो केवळ पश्चात्ताप….!

- डॉ. महेश म. कुलकर्णी  


No comments:

Post a Comment